पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

पुणे : देशातील जुलमी राजवट संपवून लोकशाही जपण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एक दिलाने काम करत महाविकास आघाडीचा पुणे लोकसभेत विजय घडवून आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पुणेकरांसमोर असणाऱ्या महागाई, बेरोजगारी व वाहतुक कोंडी यांसह देशात संविधानविरोधी कारवाई करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. या बैठकीत उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानले.
या बैठकी प्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमुख गजानन हरगुडे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभयजी छाजेड,संजय बालगुडे,स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, माजी नगरसेवक अशोक हरणावळ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.










