प्रशांत दामले स्टाईल पुष्पा : पहा व्हिडिओ..

पुणे : मराठी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील पुष्पा सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नही फायर हूं मै, झुकुंगा नही” यावर आपल्या शैलीत रील अपलोड केला आहे. त्यांच्या या हटके स्टाइल मधील रीलला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध विनोदी नट आहेत, त्यांचा विनोदी अभिनयाची कायम प्रशंसा होते. त्यांनी बनवलेला हा रील व्हिडिओ देखील असाच विनोदी ढंगाचा आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन यांचा तेलगू सिनेमा पुष्पा याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील अल्लू अर्जुन व रश्मीका मदन्ना यांचा अभिनयाला व सिनेमातील गाण्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. इंस्टाग्राम, फेसबुकवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी केलेल्या रिल्स व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अल्लू अर्जुन यांचे डायलॉग सर्वांपर्यंत पोहोचले.
अजय जडेजा, इरफान पठाण, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर अशा सुप्रसिद्ध क्रिकेटपटूंनी देखील या डायलॉग वर रील्स केले व ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले. तर हिंदी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री या सिनेमाच्या गाण्यांवर थिरकताना पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुष्पाचे वारे वाहत आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.




