राजकीय

एकनाथ खडसें पाठोपाठ या नेत्याचा भाजपला रामराम

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ भाजपला दुसरा धक्का बसला आहे.

पक्ष विस्तारासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगराव गायकवाड यांनी काम केले होते.बीड लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा ते निवडून गेले होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून दोन वेळाने ते निवडून आले होते. राज्यात सहकार राज्यमंत्री आणि केंद्रात शिक्षण राज्यमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे.

मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षातून खासदार झाले होते. नंतर ते परत भाजपमध्ये आले.पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही असा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे. ते परत राष्ट्रवादीत जाणार का ?हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये