महापालिका निवडणुकीच्या दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात गर्दी होते. त्यात कधी गंभीर तर कधी गमतीदार प्रकार घडतात. नमुनेदार माणसेही भेटतात.
एका पक्षाच्या कार्यालयात डिजिटल सभासद नोंदणीची धांदल उडाली होती. त्या वेळी एक तरुणी आली, तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले. एका पक्षातून पक्षांतर करून आल्याने तिच्या स्वागतात अधिक उत्साह होता. पहिला पक्ष आपण का सोडला, आता पक्ष सोडल्यावर आपल्याला त्रास कसा दिला जातोय, असे सगळे तिने सांगितले. माझे फलकही फाडले जातात अशी तक्रार तिने केली. त्यावर ‘घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तुला लढायचय, त्याची तयारी सुरू कर’, असे सांगून नेत्यांनी तिला आश्वस्त केलं.
सगळं कसे उत्साहाचे वातावरण होते. नेतेही खूश होते. पण… दहा पंधरा मिनीटात वातावरण अचानक बदललं. कारण, आपण ज्या तरुणीला पक्षाचे तिकीट द्यायचे ठरविले ती मतदारच नाहीये, असे आढळून आले होते. झालं असं की, तिचे नाव मतदार यादीत दिसेचना. शेवटी एकाने तिला विचारले की, ताई याआधी तू कुठल्या केंद्रात मतदान केले आहेस ते सांग. म्हणजे त्याप्रमाणे कॉम्प्युटरवर तुझे नाव आपल्याला तपासता येईल. तेव्हा ती तरुणी म्हणाली गेली पंधरा वर्षे मी मतदानच केलेले नाही. तिचे हे उत्तर ऐकून तिथे असलेल्या सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. नेत्यांची जाम पंचाईत झाली.
दुसऱ्या पक्षाच्या बालेकिल्ल्यातून आपल्याकडे आली आहे म्हणून, आपण तिला तिकीट द्यावयाचे ठरवतोय. पण, ही तर मतदारही नाही आणि गेल्या १५ वर्षात तर तिने मतदानही केलेले नाही. हे ऐकून नेते सर्दच झाले. वातावरणातला हा बदललेला मूड तिने ओळखला. दोन दिवसात नांव नोंदविते सांगत तिथून काढता पाय घेतला.
यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यातून नेते सावध झाले आहेत. तरीही निवडणुकीच्या धामधुमीत कळत नकळत असे प्रकार घडून जातात.
टीम- सिंहासन NEWS
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– ‘पंजा’ चिन्हावर देशात पहिला विजय मिळविणारे प्रकाश ढेरे https://www.sinhasannews.com/prakash-dhere-who-won-the-first-victory-in-the-country-on-the-paw-symbol-8957/
सिंहासन NEWS- एका क्षणात निर्णय अन् कोथरुडच्या कचरा डेपोचा प्रश्न निकाली.. https://www.sinhasannews.com/in-a-moment-the-decision-solved-the-question-of-the-garbage-depot-of-kothrud-9186/
सिंहासन NEWS – अशी झाली शशिकांत सुतार यांची ‘चेअरमन ‘ हि ओळख https://www.sinhasannews.com/this-is-how-shashikant-sutar-was-introduced-as-chairman-9375/