कोथरुडचा नावलौकिक वाढविण्यात व्यापाऱ्यांचा मोलाचा वाटा : शशिकांत सुतार

कोथरुड : Kothrud कोथरुड परिसरातील सर्व व्यापारी हे सचोटीने व प्रामाणिपणे आपला व्यवसाय करीत आहेत. कोथरुड हे त्यांचे घर असून, कोथरूडच्या नावलौकिक वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे असे मत माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार यांनी व्यक्त केले.
समस्त कोथरूड व्यापारी संस्थेच्या वतीने गुजरात कॉलनी येथे व्यापारी संस्थेची स्थापना व संस्थेच्या फलकाचा अनावरण समारंभ प्रसंगी सुतार बोलत होते. या फलकाचे अनावरण सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेंद्र जगताप, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे उपस्थित होते.
रुक्मिणी गलांडे म्हणाल्या की, व्यापाऱ्यांनी व व्यावसायिकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली हे निश्चितच कौतुकस्पद आहे. यामुळे व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी या संस्थेचा उपयोग होईल.पोलीस निरिक्षक महेंद्र जगताप यांनी व्यापाऱ्यांनी व व्यावसायिकांनी व्यवसाय करताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
पृथ्वीराज सुतार म्हणाले, या संस्थेच्या मार्फत व्यापाऱ्यांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी हक्काचे व खात्रीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या कोथरुड भागात माझ्या निधीतून सर्वत्र CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, अजून मागणीनुसार इतरत्रही CCTV कॅमेरे बसविण्यात येतील व त्यामुळे नागरिकांची ग्राहकांची व व्यावसायिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.

यावेळी सचिन निवंगुणे यांनी व्यापाऱ्यांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांबद्दल माहिती दिली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कुंभार, उपाध्यक्ष सुनील लोटलीकर, सेक्रेटरी प्रमोद कवठेकर, खजिनदार उमाकांत गुडमेवार कार्यकरणी सदस्य माधवराव दहिवाळ, सुरेंद्र सोळंकी, कुंदन उणेचा, मुकुंद भेलके, संतोष दहिवाळ, सचिन सुतार, दत्तात्रय सुतार, फुटरमल माळी, भेराराम माळी, संतोष लोटलीकर, दिनेश वीरकर, धनेश बच्चेवार, विठ्ठल बांदल, भारत सुतार, व्यंकटेश उदावंत, अभिजित डंभारे हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन अजित वाराणसीवार यांनी केले. स्वागत माधवराव दहिवाळ यांनी केले,आभार चंद्रकांत पंडीत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मराज सुतार,सुधीर वरघडे यांनी सहकार्य केले.