राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. याच निवडणुकीमध्ये हिराबेन यांनी मतदानही केलं. हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. पंतप्रधान मोदींच्या आईने वयाची शंभरी पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला होता. “मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तीमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडूनच आल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत,” असं मोदी म्हणाले होते.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये