राजकीय
आमदार शिरोळे यांच्याकडे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींचा निर्णय

पुणे : भारतीय जनता पक्षाने तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे सोपवली आहे.
या पाच मतदगरसंघांमध्ये आर्मुर, निझामाबाद ग्रामीण, निझामाबाद शहर, बोधन, बलकोंडा मतदारसंघांचा समावेश आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश राज्यांमधील मतदारसंघांची जबाबदारी भाजपने आमदार शिरोळे यांच्यावर सोपविली होती.
















