कोथरूड मध्ये रविवारी भव्य कोथरूड वॉकेथॉन ; सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन
कोथरूड : कोथरूड मध्ये रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा वॉकेथॉन घेण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस देशात विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भव्य कोथरूड वॉकेथॉनचे आयोजन केले गेले आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने कोथरूडकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक अमित तोरडमल व श्वेता अमित तोरडमल यांनी केले आहे.
केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. या वॉकेथॉनला कोथरूडमधील शांतीबन गणेश मंदिरापासून सकाळी ७ वाजता सुरुवात होणार असून महेश विद्यालय मैदान, कुमार परिसर रोड कोथरूड येथे सांगता होणार आहे. सर्व सहभागींना टी-शर्ट मेडल्स सर्टिफिकेट्स देण्यात येणार असल्याचे आयोजक अमित तोरडमल यांनी सांगितले.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत
“स्वच्छ कोथरूड – स्वस्थ कोथरूड” हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी या भव्य कोथरूड वॉकेथॉन २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक : श्वेता अमित तोरडमल













