राजकीय
नितेश राणेंचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

मुंबई : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यानुसार आज कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे. यानंतर ते आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

या विषयी बोलताना नितेश राणेंचे वकील म्हणाले की, ‘नितेश राणेंचा जामीन नाकारला आहे. इथे जामीन मिळणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लगेचच उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. उद्या किंवा परवा सुनावणी होईल’



