राजकीय
PMC Election 2022 : महापालिका निवडणूका एप्रिल-मे दरम्यान होणार !

राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू
मुंबई : ओबीसींना तूर्त तरी राजकीय आरक्षण लागू होणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट झाल्याने पुण्यासह 14 महापालिका, 200 पेक्षा अधिक नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 200 पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

या निवडणूका एप्रिल अखेरीस ते मे सुरूवातीला घेतल्या जातील, असे संकेत निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थांकडून देण्यात आले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यावर आरक्षणाची प्रक्रिया केली जाईल. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा त्यात समावेश नसेल. ओबीसीसाठी राखीव असलेल्या 27 टक्के राखीव जागा या खुल्या वर्गातून भरल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.






