पुणे शहर

तेवीस गावांच्या पाणी प्रश्नी अजित पवारांनी हस्तक्षेप करावा- उज्वल केसकर

पुणे : न्यायालयाचे आदेश असताना देखील पुणे महापालिका आयुक्त तेवीस गावातील नागरिकांना पाणी द्यायला नकार देतात याचा आम्ही निषेध करतो आणि कार्यक्षम पालकमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केली आहे.

केसकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय विक्रम कुमार यांचे विधान संतापजनक तर आहेच पण प्रचलित कायद्याच्या विरोधात जाऊन आम्ही कुठल्याही परिस्थितीत हायकोर्टाने काहीही आदेश दिला तरी त्याचे पालन करणार नाही ही दर्पोक्ती दाखवणार आहे PMRDA बांधकाम शुल्क जमा करते .म्हणून महानगरपालिका पाणी देणार नाही बिल्डरांनी बिल्डिंग बांधली आहेत म्हणून त्यांच्याकडून पाणी घ्या असं म्हणणं महापालिकेच्या आयुक्तांना निश्चित शोभादायक नाही राज्य सरकार लक्ष घालत नाही PMRDA पैसे घेण्यामध्ये दंग
महाराष्ट्र शासन आणि PMRDA ह्या दोघांचे याकडे दुर्लक्ष आहे कोर्टात केस आहे त्याकडे दुर्लक्ष आहे एकाला डिपीत इन्टरेस्ट आहे दुसर्‍याला निवडणूकांसाठी २३ गावे पाहिजेत सर्व सामान्य जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल याची कोणालाच चिंता
नाही

पालकमंत्र्यांनी पुण्याच्या या पाण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन खरं म्हणजे यापूर्वीच बैठक घेणे अपेक्षित होतं परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे राहिल असेल या शुक्रवारी,शनिवारी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा हि विनंती 23 गावातील लोकांना पाणी द्या अशी मागणी केसकर यांनी केली आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये