कोथरुड

आर पी आय (आठवले) कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब खंकाळ यांची निवड


कोथरूड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब
खंकाळ यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष
शैलेश चव्हाण, बाळासाहेब जानराव, परशुराम
वाडेकर, ॲड.मंदार जोशी, केशव पवळे, बाबासाहेब
तुरकमारे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मिलिंद शेजवळ, नवनाथ सोनावणे, जीतेश दामोदरे, तात्या कसबे, नितीन खंकाळ, कृष्णा खंकाळ, सुरेंद्र शिंदे, योगेश जंजाळ, सतीश खळगे, लखन साठे, महादेव खळगे, वसंत बनसोडे, वसंत ओहाळ, अमित तुरुकमारे, राम खळगे, सत्येश हिवरे, विशाल ओहाळ आदी यावेळी उपस्थित होते.

या पदाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाताना नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे तसेच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणार आहे. खा. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार असून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब खंकाळ यांनी निवडीनंतर सांगितले.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1
Img 20220910 wa00253950213425057106133

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये