राष्ट्रीय

दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एनआयएने न्यायालयाकडे यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. मागच्या सुनावणीत यासीन मलिकने दहशतवादासाठी फडिंग केल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले आहे. मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचा आरोप होता. १० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.

मागील सुनावणीत 10 मे रोजी न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये