पुणे शहर

आजचा दिवस हा प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण–दीपक मानकर

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी प्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक मानकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देत त्यांचे आणि भारत सरकार व महायुती सरकारचे आभार मानले. 
                               
दीपक मानकर म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,शौर्यगाथेची साक्ष देणारे महाराष्ट्रातील किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग  आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रवासीयांकडून भारत सरकार, महायुती सरकार सर्वांचे  मन:पूर्वक आभार.

Img 20250711 wa01938153452573979352517
Img 20250704 wa00173607138186167183613
Img 20250508 wa0001235733770892078245
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये