राज्य कामगार विमा महामंडळाच्या पुणे कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे : राज्य कामगार विमा महामंडळाच्या(ईएसआयसी) बिबवेवाडी, पुणे स्थित उप प्रादेशिक कार्यालयात 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या प्रसंगी कार्यालय प्रमुख उप संचालक (प्रभारी) हेमंत कुमार पाण्डेय , ईएसआयसीचे उप संचालक चंद्रशेखर पाटिल, अनिल युमनाम, सहायक संचालक संदीप कुमार , राज्य कामगार विमा योजनेचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी बाळकृष्ण रंगदल व अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. सेवानिवृत पोलिस उपअधीक्षक अनिल सांडभोर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते . सांडभोर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात ध्वजारोहण पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पाण्डेय यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की संविधान अंमलात आल्यापासून आपल्या देशाने कौतुकास्पद प्रगति केली आहे. अर्थव्यवस्थेबद्दल सांखिकी माहिती देताना त्यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत पाहिले तर अर्थव्यवस्थेत फार मोठी वृद्धि झालेली आहे.त्यांनी उप प्रादेशिक कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशंसा करताना सांगितले कि पुणे कार्यालय जास्तीत जास्त विमाधारक व्यक्तींपर्यंत पोहोचन्यात यशस्वी झाले आहे.मागील तीन वर्षांत विमाधारक व्यक्तींच्या सुविधेसाठी विविध ठिकाणी शाखा कार्यालय व औषधालय सुरु करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी शाखा कार्यालय व औषधालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
या प्रसंगी उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुल बेले यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप वन्दे मातरम च्या गायनाने करण्यात आला.
