संक्रातीचे वाण म्हणून वस्तू न देता एरंडवणा मध्ये महिलांची आरोग्य तपासणी

कोथरुड : संक्रातीचा सण साजरा करत असताना महिलांचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात,यात वाण म्हणून काहीतरी वस्तू देण्याची परंपरा आहे,पण एखाद्या वस्तूपेक्षा केवळ महिलांनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना उत्तम आरोग्य लाभण्याची गरज आहे अशी संकल्पना घेऊन संस्कृतीचे वाण म्हणून आरोग्यविषयक कार्यक्रम घेतल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात जनरल तपासणी किंवा तत्सम आरोग्य शिबिरे झाली नाहीत व वस्ती विभागात महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून एकूणच स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले जाते ही बाब लक्षात घेता संक्राती निमित्ताने अारोग्याचे वाण देण्याची योजना असून आज दहा चाळ येथील नागरिकांच्या आरोग्य तपासणी नंतर सर्वच वस्त्यांमध्ये अश्या कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे ही खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रभाग क्रमांक १३ तर्फे क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै.माधवराव आचवल ट्रस्ट यांच्या सहकार्याने नयनतारा आय क्लिनिक च्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, नेत्र व दंत तपासणी आणि मोफत कांचबिंदू, मोतीबिंदू आणि तिरळेपणाची शस्त्रक्रिया ( ऑपरेशन ) अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.
वस्ती विभागातील नागरिकांना गरज आहे म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला असे नव्हे तर अश्या सेवाकार्यातून आम्हाला ही समाधान लाभते आणि आपला समाज सुदृढ रहावा ही भावना यामागे आहे असे डॉ.अनिल परांजपे यांनी सांगितले.

यावेळी संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे,भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस ॲड.प्राची बगाटे, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, संगीता आदवडे, रमा डांगे, जयश्री तलेसरा, सुवर्णा काकडे, अपर्णा लोणारे, माणिक दीक्षित, महिला मोर्चा आय टी सेलच्या पुणे शहर प्रमुख कल्याणी खर्डेकर,अमोल डांगे,वैभव जमदाडे इ मान्यवर उपस्थित होते.



डॉ अनिल परांजपे,डॉ मेधा परांजपे,डॉ मधुरा आचवल,डॉ अमोल पाठक,डॉ.मिहिर परांजपे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक व संयोजन केले, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले, राजेंद्र येडे व संगीता आदवडे यांनी आभार मानले.



