सांस्कृतिकसिनेजगत

‘या’ ओटीटीकडून महिलांना वर्षभरासाठी फ्री सबस्क्रिप्शन

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त एका ‘ओटीटी’ने स्त्रियांसाठी खास ऑफर आणली आहे. हा ऑफर अंतर्गत महिलांना वर्षभरासाठी फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तर चला जाणून घेऊ याविषयी..

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संचालक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. स्त्रियांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आम्ही जगभरातील महिलांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे घर, नोकरी, मुले यांचा ताळमेळ साधत असताना स्त्रियांमधील ‘मी टाईम’ हा कुठेतरी हरवत चालला आहे आणि तो त्यांना परत मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल आजच्या या खास दिनी उचलले आहे. स्त्रियांना मनोरंजनासाठी वेळच मिळत नाही. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आवडीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही पाहता येतील. चित्रपट, वेबसिरीज, टॉक शो, संगीत अशी मनोरंजनाची विविध माध्यमे इथे उपलब्ध आहेत.”

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे फ्री सबस्क्रिप्शन 8 मार्च 2022 रोजी मिळवू शकता.

https://pltmt.onelink.me/yaD9/321dcce7

(तुम्हाला ही माहिती, बातमी आवडली असल्यास आपल्या मित्र, मैत्रिणी, नातलगांसोबत शेअर करा आणि सिंहासन न्यूजचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.)

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये