सांस्कृतिक
“मराठी प्रेक्षक गेले कुठे?”, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांची पोस्ट व्हायरल

पुणे : सध्या हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असून त्यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी, शेर शिवराज या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मराठीतील अनेक कलाकार यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
महेश टिळेकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी चित्रपटागृहातील रिकाम्या खुर्च्या दिसत आहे. त्यासोबत त्यांनी मराठी प्रेक्षक गेले कुठे? असा प्रश्नही विचारला आहे.



















