पुणे शहर

झाड अंगावर पडल्याने नवविवाहित जोडप्यासह चिमुकलीचा मृत्यू

पुणे : सासवड ( ता. पुरंदर ) वीर रस्त्यालगत कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्याचा आणि एका सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९) व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय २३) त्याच बरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटारसायकलवर जात होते. साधारण सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे ( ता. पुरदर ) येथून जात असताना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरीक मदतीला धावले. पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. रेनुकेश जाधव हा परींचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. रेनुकेश आणि सारिका यांचा विवाह चार महिन्यापूर्वीच झाला होता. 

Fb img 1650716403669
अपघातात मृत्यू झालेले रेनुकेश गुणशेखर जाधव व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव.
Fb img 1650716409063

अपघातात मृत्यू झालेली ईश्वरी संदेश देशमुख.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये