राष्ट्रीय

Video : वाढत्या महागाईसाठी स्मृती इराणींनी दिला या 3 गोष्टींना दोष

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅसचे दर सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली-गुवाहाटी विमानातून इंधन दरवाढीबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेले उत्तर आता चर्चेत आलं आहे. काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा यासंदर्भात व्हिडीओ ट्विट केला आहे.

नेट्टा डिसोझा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना स्मृती इराणींना टॅग केलं आहे. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “मोदीच्या मंत्री स्मृती इराणी यांची गुवाहाटीला जाताना भेट झाली. एलपीजीच्या वाढत्या किमतींबद्दल विचारले असता, त्यांनी मोफत लसी, रेशन आणि गरीबांनाही दोष दिला! सामान्य लोकांच्या दुःखावर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली हे या व्हिडीओत पाहा!”.

https://twitter.com/dnetta/status/1513043536635400204

इराणी यांनी सुरुवातीला काँग्रेस नेत्या मार्ग अडवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि वाढत्या किमतीबद्दल विचारलं असता ‘खोटं बोलू नका’ असे म्हणताना त्या ऐकू येतात.

Fb img 1648963058213
Img 20220409 wa00076833851649454856397

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये