१ मे महाराष्ट्र दिननिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगडावर स्वच्छता मोहिम..

स्वच्छता मोहीमेमुळे गडावरील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
पुणे :१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सिंहगडावर राजे शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि प्रतिष्ठानकडून करण्यात आलेला दुर्ग स्वच्छतेचा संकल्प आज प्रत्येक्षात साकारला गेला. सिंहगडावर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकास्थळी सकाळी ७ वाजता शिववंदना घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेत अवघ्या २ तासात प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टीकचा कचरा जमा केला. यावेळी सिंहगडावर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्लॅस्टीकच्या कचऱ्याविषयी तेथील व्यवसायिक तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. आजच्या स्वच्छता मोहीमेमुळे गडावरील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सिंहगडावर प्लॅस्टीक बंदी असताना एवढा मोठ्या प्रमाणावर होत असलेला कचरा म्हणजे स्थानिक प्रशासनाचे अपयश आहे, त्यांनी लवकरात लवकर प्लॅस्टीक कचऱ्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा राजे शिवराय प्रतिष्ठान या विषयात आंदोलन करण्याची भुमिका यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी घेतली.
या प्रसंगी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सिंहगडावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व राष्ट्रगीत घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोब राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष अतुल गोणते, सागर काळखे, रुपेश अरवट, संदिप तुपे, निलेश पारीख, स्वप्नील भोसले, अमित कदम, ललीत गव्हाणे, सुरज शिंदे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.












