राष्ट्रीय

दिल्लीतील घटना का घडली याचा विचार होणे गरजेचे : शरद पवार

मुंबई : दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही. पण ही घटना का घडली हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कृषी कायद्याबाबत सरकारने टोकाची भूमिका सोडून संवाद साधने गरजेचे आहे. पंजाब ला अस्वस्थेकडे नेण्याचे पातक मोदी सरकारने करू नये. बळाचा वापर करून हा विषय संपवू वाटत असेल तर ते चुकीचे ठरेल असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. We need to think about why the incident took place in Delhi

पवार म्हणाले, ज्यावेळी हे बिल गोंधळात मंजूर झाले तेव्हाच पुढे जाऊन ही परिस्थिती बिकट होईल असं वाटतं होत. बिलावर सविस्तर चर्चा करावी असं विरोधक म्हणत होते. चर्चा करायची नसेल तर सिलेक्ट कमिटी मध्ये विधेयक चर्चेला घ्या असे विरोधकांचे म्हणणे होते पण हे बिल चर्चेविना घाईगडबडीत मंजूर करून घेण्यात आले. 

‘मुंबईतही शेतकरी आंदोलन झाले पण  ते संयमाने हाताळण्यात आले.  तशीच भूमिका केंद्राने घ्यायला हवी होती. गेली कित्येक दिवस शेतकरी कडाक्याच्या थंडीत संयमाने आंदोलन करत आहेत. विघातक कृत्य करणारे एवढ्या मोठ्या संख्येने येतात का?’ असा सवालही पवार यांनी उपस्थित  केला आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं आहे तेव्हा तेव्हा पंजाब समोर आला आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्या पंजाबी लोकांना खलिस्तानी बोलणं चूक आहे, असंही पवार यांनी म्हंटले आहे.

3
1
Img 20210126 wa0006
Img 20210126 wa0005
Img 20210126 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये