मोरया मित्र मंडळ आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात उत्साहात सहभागी होत महिलांनी दिलं एकमेकींना संक्रांतीच वाण..

कर्वेनगर : संक्रांत रथसप्तमी सप्ताह औचित्य साधून कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळाच्या वतीने हळद कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकमेकींना संक्रांतीचे वाण व शुभेच्छा देत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पाडला.
हिंदू धर्मात मकर संक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांत म्हणजे महिलांचा सण. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुकूंवाचा कार्यक्रम केला जातो. हा हळद कुंकू कार्यक्रम महिला एकमेकींना हळद कुंकू लावून तिळगुळ आणि वाण देऊन साजरा करतात. घरोघरी याचे उत्साहात आयोजन केले जाते आणि एका चैतन्यमय वातावरणात हा हळद कुंकू कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत सुरू राहतो.










मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने हळद कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने परिसरातील सर्व महिला एकत्र आल्या होत्या. हळद कुंकू लावून, तिळगुळ वाटप करुण वाणांची आणि विचारांची लूट करुन हा सण महिलांनी उत्साहात साजरा केला.
यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष सागर शिगवण,सुरेखा जोशी, रेणुका जावळे , संगीता भरम, कांता सपकाळ, वर्षा शिगवण, स्वाती दळवी, ज्योती कामनाळी, पौर्णिमा केसवड, सारिका ठोंबरे आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.


