राजकीय

दिल्ली उच्च न्यायालयाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना समन्स ; प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली हायकोर्टानं संजय राऊत ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावलं आहे.कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत.

शिवसेनेचे आमदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. ज्या-ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्या-त्या आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केली असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

याच मानहानी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं आज याचिका दाखल करुन घेतली आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावलं आहे. तसेच, कोर्टानं तिघांनाही याप्रकरणी स्वतः वैयक्तिकरित्या कोर्टात हजर राहून या आरोपांसंदर्भात स्वतःची बाजू मांडावी, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये