राजकीय

बिहारची निवडणूक सोपी नव्हती- देवेंद्र फडणवीस

मुंबईः बिहार विधानसभा निवडणुकीचे अन्वयार्थ वेगवेगळया पद्धतीने राजकीय तज्ञ मांडत आहेत. मतदानाचे सर्व निकाल जाहीर झाले.त्यात नितीशकुमार सरकार जाईल असे अंदाज दिले होते. बहुतेक अंदाज चुकले, भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या मते, ही निवडणूक भाजपसाठी सोपी नव्हती.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी म्हटले आहे की यंदा बिहारमध्ये आलेला महापूर, लाखो स्थलांतरित मजूर आणि कोरोनाची साथ असे तीन मुद्दे समोर होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही प्रश्न कौशल्याने हाताळले. याचा फायदा भाजप युतीला झाला.

बिहार निवडणुकीत काँग्रेस पक्षाने देशाची ढासळती व्यवस्था, चीनचा धोका, कृषी विधेयक असे राष्ट्रीय मुद्दे मांडले.परंतु राज्यातील प्रश्नांवर मतदारांनी कौल दिला, असा अर्थ फडणवीस यांच्या मुलाखतीतून निघतो.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये