राष्ट्रीय

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टात राजीनामा

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गुरूवारी त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती.

न्या. देव नागपूरकर असून त्यांची ५ जून २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांना न्यायमूर्ती पदी कायम करण्यात आले होते. त्यांनी शुक्रवारी न्यायालयात आल्यानंतर त्यावेळी उपस्थित असलेल्या वकिलांना पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. दरम्यान, त्यांनी भावनिक होऊन आपले मन मोकळे करताना आपण सर्व एक परिवार आहोत आणि परिवाराचा विकास व्हावा हाच आपला नेहमी उद्देश होता, असे वकिलांना सांगितले. तसेच, सर्वांना चांगले काम करीत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचे सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये