पुणे शहर

वारजे साहित्यिक कट्ट्यावर काव्य संमेलनाच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

वारजे : वारजे साहित्यिक कट्ट्यावर आयोजित करण्यात आलेले काव्य संमेलनात कवींनी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर करत संमेलनात रंगत भरली. कोणी, गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला तर कोणी पुतळ्याचे मनोगत व्यक्त केले. नात्यांच्या हळूवार पणाबरोबरच लोकनेते शरद पवार Sharad Pawar यांनाही कवितेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

साहित्यिक कट्टा वारजे आयोजित व विरोधीपक्ष नेत्या दिपाली  प्रदिप धुमाळ व माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे, सुप्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

कवि संमेलनात ज्योत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, डी.के.जोशी, अशोक शहा, राजेंद्र वाघ, गजानन अराणके, अरुणा गोखले, सुजाता बोधनकर, चंद्रशेखर धर्माधिकारी, धनश्री कानेगावकर, विनायक देशपांडे, महेश कुलकर्णी, साधना कुलकर्णी, किसन म्हसे, गुलाब सुर्यवंशी, अनंत खोडे, आसाराम काजळकर, कृष्णकांत चेके, रामचंद्र जुन्नरकर, स्वाती गोखले, श्रीकांत वाघ, मंजुषा आचरेकर, गयावळ, जोत्स्ना तानवडे, संजय पवार, नंदकिशोर बोधाई आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm

“चालता चालता पायांना मिळत गेली गती
मागे राहून गेली गावाकडची प्रेमळ माती”
“गावातला गजबजले पणा शहरात मात्र सापडत नाही
इथ व्यवहारा शिवाय कोणीच कोणाशी नातं जोडत नाही.”
अशी माती ही कविता सादर करत कवी व लेखक वि.दा. पिंगळे यांनी बदलेल गाव व शहर यांच्यातील नाते उलगडलं

पुतळे पुसती एकमेका,कशासाठी हे विटंबन
खरच नकोस झालय दुःखी मृत्युपरांत जीवन..
चौकाचौकात असतो आमचा खडा पहारा
बेशिस्त वाहतुकीला नसतो कधी थारा..
तरीही वाहतुकीला आमचीच अडचण.
अशी पुण्यातील पुतळ्यांचे मनोगत सांगणारी कविता चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सादर केली. यावेळी सर्वच कवींनी आपल्या उत्तम काव्य रचना सादर करत उपस्थितांची मने जिंकली सदर कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी डि.के जोशी, अशोक शहा व गोपाळ कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये