महाराष्ट्र
दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे कालवश

मुंबई : दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुलूंड पूर्व याठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. डॉ. मेहेंदळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मेहेंदळे विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत एकूण १८ हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली आहेत. डॉ. मेहेंदळे यांनी महाराष्ट्र शासनासाठीही काम केले होते. मराठी बातम्या दिल्ली आकाशवाणीवरुन वाचणारे ते पहिले वृत्तनिवेदक होते. याशिवाय ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते.




