राजकीय

भाजप हळूहळू जवळ गेलेल्या पक्षांना, नेत्यांना संपवते : रोहित पवार

मुंबई : राज ठाकरे जातीय तेढ निर्माण करणारी भाषा करत आहेत. मात्र, भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंवा पक्षाला हळूहळू संपवले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत, असा सल्ला आमदार रोहित पावर यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

पक्षवाढीच्या नावाखाली भाजपने शिवसेनेला पुन्हा संपवण्याचा प्रकार सुरू केला. आता ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपशी सलगी वाढवत असल्याने त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत. संजय राऊत हे भावनिक होऊन बोलतात. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडले. कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवासाचे भूमिपूजन रोहित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर मत मांडले.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये