राजकीय

उर्मिला मातोंडकर यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश

मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ऊर्मिला यांनी सेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधनाचा धागा बांधून ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याचे जाहीर केले.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्याच नेत्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. तसंच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा मातोश्रीवर येण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेची महिला आघाडीच्या उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मातोश्रीवर हजर होत्या.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये