कोथरुड

कर्वेनगरमध्ये परिवर्तन होणारच या निश्चयाने कर्वेनगर परिवर्तन आघाडीचा तिळगुळ समारंभ संपन्न..

पुणे : कर्वेनगरमध्ये परिवर्तन होणारच या निश्चयाने कर्वेनगर परिवर्तन आघाडीचा तिळगुळ समारंभ पार पडला. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर  स्थापन झालेल्या कर्वेनगर परिवर्तन आघाडीची चर्चा सध्या कर्वेनगर आणि परिसरात जोरदार सुरू आहे.

कर्वेनगर मध्ये परिवर्तन होणारचं हा संकल्प या तिळगुळ समारंभात करण्यात आला. कर्वेनगर परिवर्तन आघाडीचा नवीन वर्षातील पहिला कार्यक्रम उत्साहात पार पाडला.
याप्रसंगी माणिक दुधाने, बाळासाहेब बराटे, तेजल मयूर  दुधाने, विनोद मोहिते, विजय खळदकर , संगीता संजय बराटे, प्रवीण दुधाने, आनंद तांबे, महेश पवळे, वैशाली  दिघे असे असे विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित  होते.

यावेळी उपस्थितांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतिच्या शुभेच्छा दिल्या.  आपली मनोगते व्यक्त करताना उपस्थित मान्यवरांनी कर्वेनगर मध्ये परिवर्तन करण्याचा विश्वास व्यक्त केला. 

या प्रसंगी कांता बराटे, अशोक पानेकर, हभप पोपट बराटे, हिंदुराव पाटील, बाळासाहेब बबनराव बराटे, बाळासाहेब  खन्डोबा बराटे, संजय नानासाहेब  बराटे, सुनील तोडकर, संजय साळुंके, तानाजी शिंदे  व परिसरातील  महिला  व नागरिक तरुण वर्ग कार्यक्रमास  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20220119 wa0206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये