महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी असा साजरा केला आपला वाढदिवस..

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसननगर येथील मुलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खाऊ व पुस्तके वाटप करण्यात आली.

स्वयम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् ॲपचे अनावरण, स्वयम् च्या ‘झेप’ या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयम् ॲपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी स्वयम् च्या संस्थापक डॉ. निता देवळालकर उपस्थित होत्या.

Img 20220910 wa00253950213425057106133

नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्वीकार

मुख्यमंत्र्यांनी आनंद आश्रमात धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये